
बीड – भाजप आमदार सुरेश धस यांनी करुणा मुंडे यांच्या अटके संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांना कारमध्ये पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात सुरेश धस यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला.

करुणा शर्मा-मुंडे यांच्या कारमध्ये एका पोलिसाने साडी नेसून बंदूक ठेवली होती, असा आरोप धस यांनी केला होता. त्यानंतर आता या पोलिसाचे नाव सांगत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पैठणच्या सभेमध्ये बोलताना धस यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव जाहीर केले आहे. संजय सानप या पोलिस कर्मचाऱ्याने करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये बुरखा घालून बंदूक ठेवली होती. असे सुरेश धस यांनी म्हंटले. याच प्रकरणामुळे करुणा मुंडेंना जेलवारी भोगावी लागली होती. बीडमध्ये आणि परळीमध्ये खरेखुरे पोलिस पाठवण्यापेक्षा सोनी टीव्हीवरच्या सीआयडी मालिकेतले पोलिस पाठवावेत. नाहीतरी हे पोलिस अभिनय करीत आहेत, असा टोला धसांनी लगावला आहे. दरम्यान पिस्तूल करुणा मुंडेंना जेलवारी भोगावी लागली होती. त्यांना बीडच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेले होते. त्या प्रकरणात पोलिसच सहभागी होता, असे धस यांनी म्हंटले आहे. त्याचबरोबर करुणा मुंडे किंवा डॉक्टर देशमुख असोत. यांच्यावर खोट्या अट्रॉसिटी दाखल करण्यात आलेल्या आहेत. करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये बंदूक ठेवलेल्या पोलिसाचे नाव संजय सानप असे आहे. त्याच्या जोडीला आणखी दोघे आहेत. यांनी बुरखा नेसून गाडीत बंदूक ठेवली. त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत, तरीही त्यांनी असे केले आणि त्यांना जेलमध्ये टाकले’, असे सुरेश धस यांनी म्हंटले आहे.

करुणा शर्मा यांच्या याचिकेत म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा उल्लेख टाळला आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्या विरुद्ध असलेल्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची माहितीही निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली नाही.









