
आप आणि भाजपात संघर्ष, काँग्रेस सत्तास्पर्धतून बाहेर, कोणत्या पक्षाला किती जागा?

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणूकीत सत्ता मिळवण्यासाठी आप आणि भाजप यांच्यात जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. काँग्रेसही या शर्यतीत आहे, पण खरी लढत ही आप आणि भाजपामध्ये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सी-व्होटरने त्यांच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे की, ओपिनियन पोलसाठी संपर्क साधलेल्या ५१% लोकांनी दिल्ली निवडणुकीत पुन्हा एकदा आप सरकार स्थापन होऊ शकते असे म्हटले आहे. त्याच वेळी ४२% टक्के लोकांनी म्हटले आहे की यावेळी दिल्लीत सत्ता परिवर्तन होऊ शकते. सरकार बदलू इच्छिणारे लोक काँग्रेसऐवजी भाजपच्या बाजूने मतदान करू शकतात, अस ही सर्वेक्षणात म्हटलं आहे. आपला ३९ ते ४१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला २९ ते ३१ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. दरम्यान मागील दहा वर्षापासून दिल्लीत आपची सत्ता आहे. तर त्याआधी काँग्रेस सलग १५ वर्ष सत्तेत होते. पण आता काँग्रेस स्वतःचे अस्तिव राखण्यासाठी संघर्ष करत आहे.
दिल्ली विधानसभेतील ७० जागांसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे तर निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. या निकालानंतर देशातील अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.









