या खासदाराच्या पत्नीचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध?

मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोप, खासदारावरही केला आरोप, कोण आहेत ते खासदार?, काय आहे प्रकरण?

गुवाहाटी – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते गौरव गोगाई यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. त्यांनी गोगाई यांच्या पत्नीचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी भाजपने दावा केला होता की गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले की, देशाची सुरक्षा अस्थिर करण्यासाठी जॉर्ज सोरोसह पैसे घेणे ही चिंतेची बाब आहे. ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान नियोजन आयोगाचे सल्लागार अली तौकीर शेख आणि आयएसआयशी संबंध समोर आले आहेत. तसेच दोघांनी २०१३ मध्ये विवाह केला आहे. पण आज १२ वर्षानंतरही कोलनबर्नने ब्रिटन पासपोर्ट कायम ठेवला आहे. याचा अर्थ त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले नाही असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये वेगळा नियम असताना खासदाराच्या पत्नीला इतके दिवस परदेशी नागरिकत्व का रोखण्यात आले असा प्रश्न हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. तसेच आसाम मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की २०१५ मध्ये गौरव गोगोई यांनी त्यांच्या ‘पॉलिसी फॉर युथ’ या संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली होती, त्यावेळी ते संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्यही नव्हते, त्यामुळे त्यांच्या सहभागामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी देशाच्या राजदूताशी अशा उच्चस्तरीय संवादांसाठी परराष्ट्र मंत्रालयाची मान्यता आणि बैठकीनंतरची माहिती आवश्यक असते. त्यामुळे भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे.

जर माझी पत्नी पाकिस्तानची आयएसआय एजंट असेल तर मी भारताचा रॉ एजंट आहे. ज्या कुटुंबावर अनेक खटले आहेत आणि अनेक आरोप आहेत, त्यांनी माझ्यावर आरोप केले तर मला काहीच हरकत नाही. आसामचे मुख्यमंत्री त्यांच्यावरील आरोपांपासून लक्ष हटवण्यासाठीच हे आरोप करत आहेत, असा दावा खासदार गोगाई यांनी केला आहे.