या खासदार अभिनेत्रीने सुरु केले रेस्टॉरंट

Oplus_131072

व्हॅलेंटाईन डेचा साधला मुहूर्त, रेस्टाॅरंटबद्दल म्हणाली मूर्ख बनून राहणं मला आवडतं…

मनाली- मॉडेलिंग, अभिनय आणि राजकारणानंतर कंगना राणौतने आता व्यवसाय जगातही प्रवेश केला आहे. तिने व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत ‘द माउंटन स्टोरी’ हाॅटेलचा शुभारंभ केला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना यांनी हे हॉटेल उघडणार असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. स्वत:चं रेस्टॉरंट उघडून खूप आनंद झाल्याचं तिने नमूद केलं. तसेच त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत तिने आनंदही व्यक्त केला होता. कंगनाच्या रेस्टॉरंटमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध असेल. ग्राहकांसाठी एक खास ऑफर देखील आहे. असे सांगितले जात आहे की, व्हेज फूड थाळी ६०० रुपयांना आणि नॉन-व्हेज फूड ८०० रुपयांना मिळणार आहे. रेस्टॉरंटमध्ये हिमाचली खाद्यपदार्थांना प्राधान्य देण्यात आले आहे, पहाडी चिकन आणि पहाडी जंगली मटण सोबत भात, लच्छा पराठा बटर नान आणि बदना मिठा यांचा समावेश असेल. तर पहाडी व्हेज थाळीमध्ये मूग डाळ विथ राईस, माह की दाल, दम मद्रा, कद्दू का खट्टा, कढी पकोडा आणि मटर पनीर सोबत भात, लच्छा पराठा, बटर नान आणि बदना गोड यांचा समावेश असेल. तिच्या हाॅटेलबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी त्या लोकांपैकी नाही, जे स्टॉक खरेदी करतात किंवा भाड्यानं घरं देऊन पैसे कमवतात. मला ते आवडत नाही. मला वाटतं की, मला जास्तीत जास्त लोकांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. त्यांच्याशी स्वत:ला जोडून घेता आलं पाहिजे. माझ्या आयुष्याचे काही फंडे जास्तच मूर्खासारखे आहेत. मीसुद्धा तशीच आहे, असे ती म्हणाली आहे. हे रेस्टॉंरट म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट आहे. माझ्यासाठी व्यग्र राहण्याचा आणखी स्रोत आहे. मी लेखिका आहे, चित्रपट निर्माती आहे, मी अभिनेत्रीसुद्धा आहे. हे रेस्टॉरंटसुद्धा माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम आहे, असेही कंगणा म्हणाली आहे.

https://www.instagram.com/p/DGDj9V7yFN4/?igsh=enRpejZndjQwdW1s

कंगना रणौत ही नुकत्याच इमर्जन्सी या चित्रपटात दिसली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका तिने साकारली होती. १७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता होता.