
दोघांनी एकत्र घेतले कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन, त्या खास फोटोने चर्चेला उधान?

कोल्हापूर – महाराष्ट्रातील आजघडीची आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता ही रिंकु प्रेमात पडल्याचे दिसून आले आहे. कारण सोशल मीडियावर रिंकू राजगुरुचा व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन चर्चांना उधाण आलं आहे.


सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु ही भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव युट्युबर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्याचे दिसत आहे. स्वतः कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर केला आहे. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले, असा कॅप्शन दिलेला हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. रिंकू राजगुरु आणि कृष्णराज महाडिक यांचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांनी हटके प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्व प्रतिक्रिया लग्न करणार आहात का? या आशयाच्या आहेत. तसेच आर्चीचा खऱ्या आयुष्यातील परश्या सापडला अशा देखील कमेंट केल्या जात आहेत. पण त्यांनी एकत्र दर्शन का घेतले, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कृष्णराज महाडिक हे कोल्हापूरचे नेते, भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते युट्यूबर असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ते कोल्हापूर उत्तर मधून लढण्यास इच्छुक होते.










