‘हा’ आहे जगातील सर्वात जास्त शक्तिशाली देश

भारताचा क्रमांक कितवा? या देशाकडे आहे जास्त लष्करी ताकत, पहा यादी

दिल्ली – जगात स्वतः ला शक्तिशाली करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत असतात. यासाठी स्वतःची आर्थिक ताकत आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. त्यातच आता जगातील शक्तिशाली देशाची यादी जाहीर झाली आहे. यात भारताचा नंबर कितवा आहे, याचीही माहिती समोर आली आहे.

ग्लोबल फायरपॉवर रँकिंग २०२५ जगातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली लष्करी देशांची यादी जाहीर केली आहे. देशांचे Power Index Score हा या क्रमवारीचा मुख्य आधार आहे. या स्कोअरमध्ये जितका कमी आकडा, तितकी जास्त लष्करी ताकद असे मानले जाते. एकूण ६० हून अधिक निकष या गणनेत विचारात घेतले जातात – ज्यामध्ये सैन्यबलाची संख्या, हवाई दल, नौदल, टँक फोर्स, संरक्षण बजेट, रसद क्षमता, तांत्रिक नवोन्मेष आणि भौगोलिक स्थान यांचा समावेश आहे. यात भारताला चाैथे स्थान मिळाले आहे.

१. अमेरिका – जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेकडे २१.२७ लाख लष्करी जवान, १३,०४३ विमाने आणि ४,६४० रणगाडे आहेत.
२. रशिया – रशियाकडे ३५.७ लाख जवान, ४,२९२ विमाने आणि ५,७५० रणगाड्यांसह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
३. चीन – चीनकडे ३१.७ लाख जवान, ३,३०९ विमाने आणि ६,८०० रणगाडे आहेत.
४. भारत – भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश असून, त्याची लष्करी ताकदही त्याच प्रमाणात वाढली आहे. भारताकडे ५१.३७ लाख लष्करी जवान, २,२२९ विमाने, आणि ४,२०१ रणगाडे आहेत.
५. दक्षिण कोरिया – उत्तर कोरियाकडे ३८.२० लाख जवान, १,५९२ विमाने आणि २,२३६ रणगाड्यांसह पाचव्या स्थानावर आहे.
६. युनायटेड किंग्डम – कमी संख्येच्या जवानांनाही, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर क्षमतांच्या जोरावर यूके सहाव्या क्रमांकावर आहे.
७. फ्रान्स – ३.७६ लाख लष्करी कर्मचारी, ९७६ विमाने आणि २१५ रणगाड्यांसह फ्रान्सचा युरोपात मोठा प्रभाव आहे.
८. जपान – १,४४३ विमाने आणि ५२१ रणगाड्यांसह, जपान एक आधुनिक आणि प्रगत लष्करी यंत्रणा विकसित करत आहे.
९. तुर्की – ८.८३ लाख जवान, १,०८३ विमाने आणि २,२३८ रणगाडे आहे.
१०. इटली – २.८ लाख जवान, ७२९ विमाने आणि २०० रणगाडे असूनही, नाटोच्या प्रभावामुळे इटलीला दहावे स्थान प्राप्त झाले आहे.