पतीने मारहाण केल्याचा आरोप, नवरा कसाई निघाल्याचा आरोप, कोण आहे तो खेळाडू, पत्नीही खेळाडू
दिल्ली – वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुरा व भारताचा माजी कबड्डी कर्णधार दीपक हुड्डा यांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपक हुड्डा व स्वीटी बूरा हे पती पत्नी आहेत. स्वीटीने पती दिपकवर मारहाणीचा आरोप केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
वर्ल्ड बॉक्स स्वीटी बुराने आपल्या सोसश मीडिया हॅंडलवरून दीपकसोबतचे फोटो डिलीट केले असून तिने आता घटस्फोटाची याचिका कोर्टात दाखल केली आहे. पोलिसांकडून दीपकला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, पण तो हजर राहू शकला नाही. तर, दीपक हुड्डानेही आता स्वीटी बुराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वीटी बूराचे आई वडील व्याजावर पैसे मागत मला फसवत राहिले. हिसारमध्ये त्यांनी सेक्टर १-४ प्लॉट खरेदी केले होते. फसवणुकीतून ते फ्लॅट माझ्या आणि स्वीटीच्या नावे केले, असा दावा हुडाने केला आहे. स्वीटी बुरा हिने हिसारमध्ये दीपक हुडाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. स्वीटीने तिचा पती दीपकवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. लग्नात एक कोटी रुपये आणि फॉर्च्युनर कार देऊनही हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही स्वीटीने केला आहे. कधी वाटेल तेव्हा मारहाण करायचा, श्वास थांबेपर्यंत मारहाण करायचा, अनेक दिवस घरात कोंडून ठेवायचा, हुंड्यात आणखी एक कोटी आणि फॉर्च्युनर हवीय असा सांगायचा. ज्याच्यासाठी सर्वस्व सोडले तो कसाई निघाला, असे गंभीर आरोप स्वीटीने केले आहेत. दोघेही भाजपा नेते आहेत. २०१५ साली मॅरेथॉनमध्ये मुख्य अतिथी म्हणून आलेले असताना दोघांमध्ये मैत्री झाली.मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले अन् २०२२ मध्ये या दोघांनी लग्न केले होते. दरम्यान स्वीटी बुराने घटस्फोट घेण्यासाठी पोटगी म्हणून ५० लाख आणि दीड लाख महिना मासिक खर्च देण्याची मागणी कोर्टात केली आहे.
स्वीटी बूराला नुकतेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर दीपक हुड्डाला २०२० साली अर्जुन पुरस्कार मिळाला होता. ७ जुलै २०२२ रोजी कबड्डीपटू दीपक हुड्डा व वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुराचे लग्न झाले होते.