
अभिनेत्रीला ईडीचा दणका, अभिनेत्रीमुळे गृहमंत्रीही अडचणीत, वर्षभर मुक्काम जेलमध्येच?

बंगरुळू – गळूरू विमानतळावरून सोने तस्करी प्रकरणात कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला अटक करण्यात आली होती. १४.८ किलो सोन्यासह तिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता आणखी मोठी कारवाई करण्यात आली आहे.


आयपीएस अधिकाऱ्याची कन्या असलेल्या अभिनेत्री रान्या रावला विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तिच्यावर सोन्याची तस्करी करण्याचा आरोप आहे. तिच्याकडून 14 किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. त्याचे बाजारमूल्य 12.56 कोटी रुपये आहे. तिच्यावर निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात पोलिसांना 2.67 कोटी रुपयांची रोकड आढळली आहे. दुबईहून सोन्याच्या दागिन्यांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रान्या रावविरुद्ध परकीय चलन संरक्षण आणि तस्करी प्रतिबंधक कायदा 1974 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे तिला जामीन मिळण्यास अडचण येणार असून तिचा मुक्काम आता पुढील एक वर्ष जेलमध्येच असणार आहे. त्याचबरोबर ईडीने रान्याची ३४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या चौकशीदरम्यान रान्या राव यांनी सर्व आरोप फेटाळले. परंतु तिचा मोबाईल फोन, डिजिटल डेटा, प्रवास कागदपत्रे, कस्टम डिक्लेरेशन आणि चॅट्सवरून हे स्पष्ट झाले की ती या तस्करी नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग होती. ईडीने तिच्याविरुद्ध पुरेसे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे गोळा केले आहेत. ईडीचा तपास अजूनही सुरू आहे. उर्वरित बेकायदेशीर मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. काही दिवसापूर्वी रान्या राव सोने तस्करी प्रकरणात कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित असलेल्या एका वैद्यकीय महाविद्यालयावर ईडीने छापा टाकला होता. तपासादरम्यान, ईडीला एचएमजी परमेश्वराशी संबंधित राण्या राव आणि सिद्धार्थ मेडिकल कॉलेजमधील पैशाचे व्यवहार झाल्याचे काही कागदपत्रे सापडले असल्याचे सांगण्यात आले होते.

राण्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ पोलिस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. राण्यासोबतच सोने व्यापारी साहिल जैन आणि तरुण राजू यांनाही बेंगळुरू येथून अटक करण्यात आली. साहिलने तस्करी केलेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यास मदत केली होती. तो कर्नाटकातील बल्लारीचा रहिवासी आहे.










