मराठमोळा साज करत ही प्रसिद्ध अभिनेत्री वारीत सामील

अभिनेत्रीचा वारीतला व्हिडिओ जोरदार व्हायरल, भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ, वारीशी आहे जुने नाते

सोलापूर – महाराष्ट्रात सध्या लाखो वारकरी विठुरायाला भेटण्यासाठी आळंदी आणि देहूमधून पायी चालत जात आहेत. आषाढी एकादशीला वारकरी विठूरायाला भेटणार आहेत. वारीचा हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी अनेक कलाकार वारीत सहभागी होत असतात.

एक अभिनेत्री विठूरायाच्या वारीत सामील झाली आहे. सैराट चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्र रिंकू राजगुरु आपल्या वडिलांसह सामील झाली होती.तुकोबांची पालखी अकलूजमार्गे पंढरीला जाते. आणि रिंकू अकलूजची आहे. त्यामुळे रिंकू या वारीत सहभागी झाली आहे. कपाळी केशरी गंध, नऊवारी साडी, नाकात नथ, हातात टाळ आणि डोक्यावर तुळस घेत तिने ही पायवारी केली. पारंपरिक लूकमध्ये रिंकू अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी रिंकूने वडिलांसह फुगडी खेळ खेळली. तसेच रिंकू इतर महिला वारकऱ्यांसह काही पारंपरिक खेळ खेळताना दिसून आली. रिंकूने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की,  “जय जय राम कृष्ण हरी! हा प्रवास माझ्यासाठी खूपच खास आहे कारण, मी ४ वर्षांची असताना माझ्या वडिलांसह पहिल्यांदा वारी अनुभवली होती. आज २० वर्षांनंतर मी पुन्हा तेच क्षण अनुभवतेय…” रिंकूने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी तिच्या साधेपणाला आणि पारंपारिक लूकला पसंती दाखवली आहे.

https://www.instagram.com/reel/DLormSWtb-l/?igsh=dGJsODJ5cDBkcXpi

रिंकू राजगुरू ‘सैराट’ चित्रपटामुळे लोकप्रिय झाली. यानंतर अभिनेत्रीने ‘झिम्मा २’, ‘कागर’, ‘झुंड’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. आता लवकरच अभिनेत्री ‘पुन्हा एकदा साडेमाडे तीन’ या सिनेमात झळकणार आहे. याचबरोबर अनेक वेबसिरिजमध्ये देखील रिंकू राजगुरू दिसून आली आहे.