ही प्रसिद्ध अभिनेत्री ठरली जगातील सर्वांत प्रभावशाली महिला

Oplus_131072

असा बहुमान मिळवणारी ठरली पहिलीची अभिनेत्री, आत्ताही बाॅलीवुडमध्ये आहे टाॅपला

मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण ही निःसंशयपणे बॉलीवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री आहे, तिची जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख आहे. तिने हाॅलीवूडमध्येही आपली छाप सोडली आहे. आता दीपिका पदुकोणच्या नावावर आता नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.

दिपीका एक अभिनेत्री, निर्माती, उद्योजक आणि मानसिक आरोग्य समर्थक म्हणून स्व:तला सिद्ध केले आहे. त्यामुळे तिची ‘मोस्ट इन्फ्लूएंशल वुमन 2025’ म्हणून निवड करण्यात आली आहे. अलीकडेच, दीपिकाने एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजवर जागा मिळवली. जिथे तिला मनोरंजन क्षेत्रातील एकमेव प्रतिनिधी म्हणून ‘मोस्ट इन्फ्लूएंशल वुमन 2025’ मध्ये टॉप ५० नावांमध्ये स्थान मिळाले आहे. विविध क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी तिचा हा सन्मान करण्यात आला आहे. दीपिकाविषयी मासिकात लिहिलंय, ‘जर आपण तिच्या अभिनयाबद्दल बोललो, तर सर्वात आधी लक्षात येते ती पीकू. या सिनेमात पिकूसोबत प्रेक्षक हसले आणि रडलेसुद्धा. या पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने “पठाण”, “जवान”, “कल्कि २८९८ एडी” आणि ‘रिटर्न ऑफ जेंडर केज’सह ३० हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण सिनेमांमध्ये काम केलंय. दीपिका ही भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला सुपरस्टार आहे. जिच्या सिनेमांनी जागतिक पातळीवर बॉक्स ऑफिसवर सर्वोत्तम कलेक्शन केले आहे. त्याचबरोबर लुई व्हिटॉन आणि कार्टियर सारख्या लक्झरी फॅशन हाऊसने साइन केलेली ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. याआधी दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आले होते. हा सन्मान मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती.

https://www.instagram.com/p/DG4-jqEy980/?igsh=MXcxYmd0cWh6b2F4bA==

बाॅलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणची ओळख आहे. दीपिका पादुकोणने २००७ साली ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याआधी दिपीकाने २००६ साली कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘ऐश्वर्या’ असे या चित्रपटाचे नाव होते.