
अभिनेत्री जोरदार ट्रोल, उत्तर देताना म्हणाली, पैशात मत विकणाऱ्यांनी मला शिकवू नये…

अ. नगर – दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने धर्म बदलल्याची चर्चा रंगली होती.


राजेश्वरी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात ती बाप्तिस्मा ही विधी करताना दिसत आहे. जो ख्रिश्चन धर्मात केला जातो. त्यामुळे तिने धर्म बदलल्याची चर्चा सुरु झाली होती. तसेच तिला सोशल मीडियावर तिला काही सकारात्मक तर काही नकारात्मक कमेंट्सना सामोरे जावे लागत आहे. पण आता तिने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणाली निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण, आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे…हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे. कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे. टीप :- माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे, आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती.

राजेश्वरी खरात ही एक प्रतिभावान मराठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती २०१३ साली प्रदर्शित झालेल्या फँड्री चित्रपटातील शालू या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. चित्रपटात तिला एकही डायलाॅग नव्हता तरीही ती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने ‘पुणे टू गोवा’ आणि ‘आयटमगिरी’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.










