ही प्रसिद्ध अभिनेत्री पडली या क्रिकेटपटूच्या प्रेमात?

क्रिकेटपटूचं नाव ऐकताच लाजली अभिनेत्री, यामुळे समोर आली लव्हस्टोरी, आई म्हणाली..

दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा खेळाडू त्याच्या खेळामुळे नाही, तर त्याच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी मोहम्मद सिराजचे नाव ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेशी जोडले जात होते. मात्र या दोघांनीही एकमेकांना भाऊ-बहीण म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला होता. पण आता पुन्हा तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. बिगबॉस १३ फेम अभिनेत्री माहिरा शर्मा हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २८ वर्षीय अभिनेत्रीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याआधी तिचे नाव बिग बॉस १३ मधील स्पर्धक पारस छाबडा सोबत जोडले गेले होते. मात्र चार वर्षांनी दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. नुकतंच माहिरा पापाराझींसमोर पोझ देताना दिसून आली. यावेळी पापाराझींनी तिला “तुझा आवडता क्रिकेटपटू कोणता आहे? असं विचारलं. यावर पापाराझींच्या या प्रश्नावर तिनं हसत “पूर्ण इंडियन क्रिकेट टीम” असं उत्तर दिलं. यानंतर पापाराझींनी सिराज सिराज असं म्हणत तिला चिडवायला सुरुवात केली. पण, यावर तिनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण तिच्या हसण्यामुळे नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मजेदार कमेंट्स केल्या आहेत. पण माहिराची आई सानिया शर्मा यांनी डेटिंगच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.माझी मुलगी एक सेलिब्रिटी आहे, म्हणून लोक तिचे नाव कोणाशीही जोडतात, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? असा प्रतिप्रश्न केला आहे.

माहिरा शर्मा ही मुळची जम्मू काश्मीरची आहे. तिने आतापर्यंत ‘नागीन ३’, ‘कुंडली भाग्य’, ‘बेपनाह प्यार’ अशा मालिकांमध्येही भूमिका केलेली आहे. ती आतापर्यंत अनेक पंजाबी गाण्यांत दिसलेली आहे. तिच्या लेहंगा या गाण्यामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली.