सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती, मुलाचे नावही ठरले, देसी गर्लने दिल्या शुभेच्छा, बाळाचा क्युट फोटो शेअर
मुंबई – अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या घरात पुन्हा एकदा बाळाचे आगमन झाले आहे. अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे. इलियानाने १९ जून २०२५ रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर बाळाच्या स्वागताची आनंदाची बातमी शेअर केली आहे. यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शनिवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करून इलियाना डिक्रूझने तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी दिली आहे. इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “आमचे हृदय खूप भरून आले आहे.” या कॅप्शनसह, अभिनेत्रीने बाळाची एक बाजू आणि लाल हृदयाचा इमोजी शेअर केला आहे. त्याच वेळी, पोस्टमध्ये एक फोटो आहे, जो तिच्या नवजात बाळाचा आहे. इलियाना डिक्रूझची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीला दुसऱ्यांदा आई झाल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. इलियाना डिक्रूझने २०२३ मध्ये तिचा जुना प्रियकर मायकेल डोलनसोबत गुप्त लग्न केले होते. बराच काळ तिने तिच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. पण एका मुलाखतीदरम्यान इलियानाने मायकेलसोबत तिचे लग्न झाल्याचे जाहीर केले होते. इलियाना डिक्रूझ २०२३ मध्ये पहिल्यांदाच आई झाली. तिच्या मोठ्या मुलाचे नाव कोआ फिनिक्स डोलन आहे आणि जवळजवळ दोन वर्षांनी, इलियानाने मुलगा कीनूला जन्म दिला आहे. दरम्यान, गेल्या बऱ्याच काळापासून इलियाना अभिनयापासून दूर आहे. अभिनेत्री तिच्या पहिल्या गरोदरपणामुळेही खूप चर्चेत आली होती.
https://www.instagram.com/p/DLa-AeVR9-5/?igsh=NmJnMTRzYTBqMndo
इलियाना डिक्रूझने २००६ मध्ये ‘देवदासू’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी इलियानाला दक्षिणेत फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्ड देखील मिळाला होता. तर २०१२ मध्ये बर्फी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.यानंतर, इलियानाने रुस्तम, रेड आणि दो और दो प्यार सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. इलियाना शेवटची ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात दिसली होती. आता ती पुन्हा सक्रिय होणार आहे.