
मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘कुंडली भाग्य’ फेम श्रद्धा आर्या आई झाली आहे. तसेच या मालिकेत शर्लिन खुराना मल्होत्रा नावाचे पात्र साकारणारी रुही चतुर्वेदी आई झाली आहे. रुहीने मुलीला जन्म दिला आहे.



अभिनेत्री रुही चतुर्वेदी नुकतीच आई झाली आहे. लग्नाच्या पाच वर्षांनी तिने बाळाला जन्म दिला आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिचा पती आणि सुप्रसिद्ध अभिनेता शिवेंद्र ओम सैनीओलबरोबरचा खास फोटो शेअर करत आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. रुही चतुर्वेदी आणि तिचा पती शिवेंद्र ओम सैनीयोल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ‘या जगात बाळाचे स्वागत आहे’ असे लिहिले आहे. रुही आणि शिवेंद्रच्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने ०९ जानेवारीला मुलीला जन्म दिला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘आमची मुलगी आली आहे.’ अभिनेत्रीने तिच्या पतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची खुशखबर दिली होती. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी अभिनेत्री रुहीने तिचा बेबी बंप दाखवणारा व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हापासून तिचे अनेक चाहते तिच्या आई होण्याची वाट बघत होते. अशातच आता तिने चाहत्यांना आई झाल्याची खुशखबर सांगितली आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनीही तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/DErMwuuso7_/?igsh=em04eDc5NnFibDJz
रुही चतुर्वेदीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती मांगल्य भाग्यम, आलाप, कंगना, पगली, लव्ह यू टर्न आणि कुंडली भाग्य या मालिकेसाठी ओळखली जाते. तिने २०१९ मध्ये शिवेंद्रशी लग्न केलं होते.










