या क्रिकेटपटूची एक्स पत्नी अभिनेत्री म्हणून करणार चित्रपटात पदार्पण

Oplus_131072

सोशल मिडियावर पोस्ट करत दिली माहिती, गाणेही प्रदर्शित , म्हणाली सगळा देवाला प्लॅन आहे…

मुंबई – भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि इन्स्टाग्रामवरील स्टार धनश्री वर्मा यांनी काही दिवसांपूर्वी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर युझवेंद्र चहल सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. तर धनश्री वर्माने देखील आपली नवी इनिंग सुरु केली आहे.

धनश्री ही लवकरच तेलुगू चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या आकाशम दति वास्तव या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात धनश्री पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. हा एक नृत्यावर आधारित चित्रपट आहे. तत्पूर्वी धनश्री वर्मा ही अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. तसेच त्यात तिने थोडाफार अभिनय केलेला आहे. मात्र या चित्रपटात ती डान्ससोबत अभिनयही करणार आहे. सिनेमाच्या टीमसोबत फोटो पोस्ट करत धनश्री म्हणाली, ‘अखेर रॅप अप झालं आहे… माझा पहिला सिनेमा… माझ्यासाठी प्रचंड खास आहे… सिनेमा हैदराबासाठी देखील खास आहे. सिनेमा पूर्ण केल्याचा अनुभव फार वेगळा असतो… उत्साही आणि मनावर दडपण देखील आहे… माझी सुपर टीम आणि दिल राजू प्रॉडक्शनसोबत चांगला वेळ घालवला आहे… लवकरच चित्रपटगृहात भेटू… सगळा देवाचा प्लॅन आहे…’ असं देखील धनश्री पोस्टमध्ये म्हणाली आहे. धनश्रीच्या भूमिकेबद्दल देखील अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सिनेमामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धनश्रीच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. धनश्री वर्मा हिच्या या चित्रपदाचं दिग्दर्शन शशी कुमार हे करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये सगळ्या नव्या दमाच्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. दक्षिणेतील कोरियोग्राफर यश हा या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या आधी धनश्रीचं एक गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘देखा जी देखा मैंने’ असं या गाण्याचं नाव असून घटस्फोटाच्या सुनावणी दिवशीच हे गाणं प्रदर्शित झालं होतं. दरम्यान धनश्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. धनश्री उत्तम नृत्यांगणा आहे आणि तिच्या नृत्याचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/DIlMGF0I38z/?igsh=aGs2Z3Jrd2VlN3hx

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२० मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. २०२५ मध्ये युजवेंद्र आणि धनश्री यांचा घटस्फोट झाला.