
मुंबई – भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट मॅचनंतर संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा रंगल्या होत्या. पण यामुळे विद्या बालन मात्र अडचणीत आली आहे.



सिडनी कसोटीत रोहित शर्मा खेळला नाही. त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने त्याने या कसोटीतून माघार घेतली. पण अशा स्थितीत रोहित शर्माने एक पीआर स्टंट केल्याचे दावा करण्यात आला आहे. यावरून रोहित शर्माला प्रचंड ट्रोल केले जात आहे. याला विद्या बालन कारणीभूत ठरली आहे. विद्या बालनने तिच्या सोशल मीडिया हँडलद्वारे रोहित शर्माचे कौतुक करताना म्हटले होते, रोहित शर्मा, काय सुपरस्टार!! स्वता: थांबण्याचा निर्णय घेण्यासाठी धैर्य लागते… तुला अधिक बळ मिळो, रिस्पेक्ट!! @ImRo45.” असे ट्विट केले होते. पण विद्या बालनचे ट्विट स्क्रिप्टेड असल्यांचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच विद्या बालनने लिहिलेला कंटेन्ट हा रोहित शर्माच्या पीआरने पाठवलेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. विद्या बालनसोबत रोहित शर्माला सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे. “तू आधी रोहितला इन्स्टाग्रामवर फॉलो तर कर आणि मग त्याला पाठिंबा दे,” असं म्हटलं आहे. “आता मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्या कलाकारांकडून क्रिकेटर्सचा पीआर केला जात आहे तर,” असा टोला विद्याला लगावला आहे. दरम्यान विद्याने एकदा फिल्मफेअरच्या मुलाखतीत म्हटले होते की ती जास्त क्रिकेट पाहत नाही, परंतु तिचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. त्यामुळे देखील विद्या बालन ट्रोल होत आहे.

भारताने ऑस्ट्रेलियात झालेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी लाजिरवाण्या पद्धतीने गमावली. या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा ३-१ अशा पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माने या मालिकेतील ३ सामन्यांच्या ६ डावात ३१ धावांचे योगदान दिले.










