
मोफत असणा-या सेवेसाठी आता पैसे मोजावे लागणार, कधीपासून लागू होणार नवे नियम?, वाचा

दिल्ली – स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेच्या ग्राहकांना १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन IMPS ट्रान्सफरवर शुल्क भरावे लागेल, जे पूर्वी पूर्णपणे मोफत होते. त्यामुळे खिशाला झळ बसणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी IMPS व्यवहार शुल्कात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. बँक आता तात्काळ पेमेंट सेवा व्यवहारांशी संबंधित शुल्कांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. आता बँकेच्या ग्राहकांना १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन IMPS ट्रान्सफरवर शुल्क भरावे लागणार आहे. हे आधी पूर्णपणे मोफत होते. ऑनलाइन यूजर्ससाठी २५००० रुपयांपर्यंतचे व्यवहार मोफत असतील. मात्र, २५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांवर शुल्क द्यावं लागेल. या नियमांची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०२५ पासून करण्यात येईल. आता २५,००० रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क नाही. २५,००१ ते १ लाख रुपयेला २ + जीएसटी, १ लाख ते २ लाख रुपये : ६ आणि जीएसटी, २ लाख ते ५ लाख रुपये- १० आणि जीएसटी मात्र ज्या ग्राहकांचे विशेष पगार खाते आहे, जसे की सरकारी किंवा खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, त्यांना मात्र या शुल्कातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये डीएसपी, सीजीएसपी, पीएसपी, आरएसपी, सीएसपी, एसजीएसपी, आयसीजीएसपी आणि एसयूएसपी सारख्या खात्यांचा समावेश आहे, ज्यांवर आयएमपीएस शुल्क अजूनही आकारले जाणार नाही.
IMPS म्हणजेच इन्स्टंट मनी पेमेंट सर्व्हिस ही एक रिअल-टाइम फंड ट्रान्सफर सिस्टम आहे, ज्याच्या मदतीने कोणतीही व्यक्ती त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. ही सेवा २४ तास आणि ३६५ दिवस उपलब्ध आहे.









