
छावा चित्रपटातील अभिनेत्रीचा लुक समोर, ट्रेलर आणि रिलीज डेटही जाहीर

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ या चित्रपटाबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलिज होणार आहे. यात विकी काैशल प्रमुख भूमिका साकारत आहे. तर येसुबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण याची प्रतिक्षा आज संपली आहे.

अलीकडेच ‘छावा’ चित्रपटातील रश्मिका मंदानाचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, ‘प्रत्येक महान राजामागे, अतुलनीय शक्ती असलेली एक राणी उभी असते.’ स्वराज्याचा अभिमान महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना दिसणार.’ असे लिहून निर्मात्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टने चाहते आता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मॅडॉक फिल्म्सने छावा या चित्रपटातील महाराणी यशूबाईच्या व्यक्तिरेखेतील रश्मिकाचे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. पोस्टरमध्ये रश्मिका मंदान्ना हसताना दिसत आहे. या नवीन लूकमध्ये रश्मिका वजनदार दागिन्यांसह एखाद्याकडे पाहत आहे. आणखी एक चित्र आहे, ज्यामध्ये रश्मिका खूपच गंभीर दिसत आहे. दिनेश विजन निर्मित ‘छावा’ छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी सिनेमा घरात रिलीज होईल. चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदानासोबत अक्षय खन्ना देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.
https://www.instagram.com/p/DFE5oyIyV57/?igsh=MTFrdDJ2cWJ0ZTBlOQ==
रश्मिकाने तामिळ, कन्नड, तेलुगू आणि बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करून जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास रश्मिका मंदाना ‘छावा’ नंतर सलमान खान सोबत ‘सिकंदर’ मध्ये दिसणार आहे. त्यानंतर ‘कुबेर’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.









