
अश्लील शेरेबाजी करत धमकी, अभिनेत्रीचेही सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाली, मी नेहमीच सीमेपलीकडील लोकांवरही….

मुंबई – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाचा अनेकांना फटका बसत आहे. आत्ता युद्ध विराम झाला असला तरीही त्याची झळ कायम आहे. यावेळी अभिनेत्री हिना खान हिने भारताच्या समर्थनात एक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अश्लील कमेंटबरोबरच धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


अभिनेत्री हिना खान तिच्या कॅन्सरमुळे अनेकदा चर्चेत असते.हिना खानने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने भारताला पाठिंबा दिल्यानंतर तिला ट्रोल करणाऱ्या सर्वांना उत्तर दिले आहे. तसेच धमकी देणाऱ्यांनाही सुनावले आहे. हिनाने लिहिले आहे की, “मी एक कलाकार आहे आणि मी आयुष्यभर सीमेपलीकडील लोकांवर प्रेम केले आहे. तुमच्यापैकी अनेकांनी मला शिवीगाळ केली, शाप दिला, ऑपरेशन सिंदूरच्या आधी आणि नंतर माझ्या देशाला पाठिंबा दिल्याबद्दल अनेकांनी मला अनफॉलो केले. इतकेच नाही तर बरेच जण मला अनफॉलो करण्याची धमकी देखील देत आहेत. या धमकीसोबतच, अपमानास्पद, असभ्य आणि अपमानास्पद शब्द देखील आहेत, जे फक्त द्वेष दर्शवतात. आपण माझ्या देशाचे समर्थन करता अशी मी अपेक्षा करीत नाही. आपण आपल्या देशाचे समर्थन करता हे ठीक आहे. परंतु या वेळी आपण कमीतकमी मानवता दर्शविली पाहिजे, मी तुमच्या सर्वांसाठी जितके करीत होतो तशीच वागणूक मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. पण मला वाटते की हा आपल्यातला फरक आहे. मी नेहमीच प्रथम भारतीय असेन. म्हणून तुम्ही लोक मला अनफॉलो करू शकता, मला त्याची पर्वा नाही. मी तुमच्यापैकी कोणाशीही गैरवर्तन केलेले नाही, मी फक्त माझ्या देशाचे समर्थन केले आहे. पूर्वी हिना खानने असे म्हटले होते की युद्धामध्ये कोणीही जिंकत नाही, फक्त निर्दोष लोक मरतात”, अभिनेत्रीचे हे विधानही बरेच चर्चेत आले होते आणि अनेकांनी तिच्या या विधानाचे कौतुकही केलेले पाहायला मिळाले होते. हिना खान पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटनांबद्दल सोशल मीडियावर सतत लिहित आहे. तिने यापुर्वी आम्ही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही आणि मला माहित आहे की आपण सर्वांना शेवटी शांती आवडते. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी मी माझ्या देशासोबत जितकी उभी आहे तितकाच तणाव कमी व्हावा अशीही मी इच्छा आणि प्रार्थना करते, अशी पोस्ट केली होती.

हिना खान हिचा जन्म जम्मू काश्मीरमध्ये झाला आहे. हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमधून पदार्पण केले आणि घराघरात ओळख मिळवली. तिने त्यात अक्षरा ही भूमिका साकारली होती. हिना खान सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती सध्या रॉकी जॉयस्वालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.










