
आयपीएलचा आणि अभिनेत्रीचा काय संबंध?, कशामुळे होत आहे ट्रोल, बघा नक्की काय घडले?

कोलकत्ता – आयपीएलच्या १८ व्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. शनिवारी त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. पण त्या दरम्यान झालेल्या कार्यक्रमामुळे एक अभिनेत्री जोरदार ट्रोल झाली आहे.

आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिशा पटानीने तिच्या परफॉर्मसने लोकांची मने जिंकली असताना, तिला ड्रेसवरून मात्र चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. नेटक-यांनी तिच्या पोशाखावर टीका केली आहे. तिने घातलेला ड्रेस हा या सोहळ्यासाठी नव्हता, कारण हा सोहळा कौटुंबिक प्रेक्षकांसाठी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. आपल्या दमदार नृत्याने दिशाने स्टेजवर आपली छाप सोडली. दिशाने समारंभात आयव्हरी ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्ट परिधान केला होता. चाहत्यांनी तिच्या दमदार डान्सचे तर कौतुक केले पण अनेकांनी तिच्या ड्रेसवरून संताप व्यक्त केला आहे. दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे, पण या ठिकाणी मात्र ती जोरदार ट्रोल झाली आहे. दरम्यान शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएल २०२५ च्या हंगामाची सुरुवात अतिशय भव्य सोहळ्याप्रमाणे झाली. समारंभात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. शाहरुखने तर विराटला त्याच्या गाण्यावर डान्सही करायसा लावाला होता.
https://www.instagram.com/p/DHlf0IcM7_R/?img_index=1&igsh=NWMycGwxdWp3dHZl
‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.









