
सोशल मीडियावर पोस्टमुळे झाला खुलासा, अभिनेत्याच्या वाढदिवसादिवशी झाला साखरपुडा, दोघांमध्ये एवढ्या वर्षाचे अंतर?

चेन्नई – तामिळ सुपरस्टार विशालने त्याच्या ४७ व्या वाढदिवशी साखरपुडा करत चाहत्यांना खास सरप्राइज दिले. विशाल आणि अभिनेत्री साई धनशिका यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला. या क्षणाचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अभिनेता विशाल म्हणाला,’या विश्वाच्या कानाकोपऱ्यातून माझ्या खास वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व प्रियजनांचे आभार. आज साई धनशिकासोबत झालेल्या माझ्या साखरपुड्याची आनंदवार्ता माझ्या कुटुंबासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. मी खूप खुश आहे. नेहमीप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यावर राहोत, हीच इच्छा आहे.’ विशाल आणि साई धनशिकाने याच वर्षी मे महिन्यात एका कार्यक्रमात साखरपुड्याची घोषणा केली होती. हा दिवस खास होता कारण याच दिवशी विशालचा वाढदिवसही असतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पहिल्या फोटोत दोघांचा गळ्यात हार घातलेला फोटो आहे. दुसऱ्या फोटोत त्यांनी एकमेकांच्या हातात घातलेल्या अंगठ्या दिसत आहेत, तर तिसरा त्यांचा फॅमिली फोटो आहे. विशालने रोमँटिक-इमोशनल पोस्ट शेअर करत त्याच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दोघे एकमेकांना मागील १५ वर्षांपासून ओळखतात आणि चांगले मित्रही आहेत. विशाल साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. २००४ मधील तमिळ चित्रपट ‘चेलामई’मुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. तर साई धनशिका २०१६ मध्ये आलेल्या कबाली चित्रपटात तिने रजनीकांतच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती.
https://www.instagram.com/p/DN7i3ZBE6xW/?igsh=emV2aWJnYnA3Nnc1
विशाल ४७ वर्षांचा आहे, तर धनशिकाचे वय सध्या ३५ आहे. दोघांमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे अंतर आहे. वयातील अंतरामुळे देखील दोघे चांगलेच चर्चेत आले आहेत. तरी देखील दोघांची केमिस्ट्री नेहमी दिसून आली आहे.










