
मुंबई – भारतीय संघातील खेळाडूंचे तारे सध्या खूपच अडचणीत आहेत. मैदानावर कामगिरी होत नसताना आता त्यांचे विवाहनाते देखील तुटून घटस्फोट होत आहेत. गेल्या वर्षी शिखर धवन, हार्दिक पांड्या यांचे नातं तुटलं होतं. त्याचबरोबर आता आणखी एका क्रिकेटपटूची भर पडली आहे.



भारताचा अनुभवी क्रिकेटपटू मनीष पांडे आणि त्याची पत्नी आश्रिता शेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे समजते. गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला मनीष पांडेने इंस्टाग्राम प्रोफाइलवरून पत्नी आश्रिता शेट्टीचे सर्व फोटो गायब आहेत. तसेच मनीष पांडे आणि त्याची पत्नी अश्रिता शेट्टी यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. दरम्यान त्यांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. एका नेटिझन्सने तर भाई घटस्फोट झाला, असे जाहीर करून टाकले आहे. मनीष पांडे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाचा भाग नाही. त्याने टीम इंडियासाठी २९ एकदिवसीय आणि ३९ टी-२० सामने खेळले आहेत. मनीष पांडे दीर्घकाळापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. गेल्या वर्षी जिंकलेल्या केकेआरचाही तो भाग होता. कर्नाटकातून आलेल्या अश्रिता शेट्टीशी २०१९ मध्ये झाले होते आणि ती एक तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे. तिने २०१२ मध्ये ‘तेलीकेदा बोल्ली’ या तुलू चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि नंतर तमिळ चित्रपटसृष्टीत ओळख मिळवली.अश्रिता शेट्टीने उधयम NH4, ओरु कन्नियुम मुनू कलावानिकलम आणि इंद्रजीथ यांसारख्या तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील नातं तुटलं होतं. यानंतर यंदा युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांच्या नात्यातही असेच काहीसे घडले होते. दोघांचा घटस्फोट झाला होता.










