वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा, ब्रेकअपचे दुःख दूर सारत म्हणाली हो… मी डेट करीत आहे…
मुंबई – हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. रुपलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
रुपाली भोसलेनं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान रुपालीला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर रुपाली म्हणाली की, ‘मी डेटिंग करतेय. मी रिलेशनशिपमध्ये पण आहे. माझं लग्न पण झालंय, स्वतःसोबत.’ मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे. नक्कीच जायचं आहे, नाही असं नाही; पण जोपर्यंत संकेतचं (रुपालीचा भाऊ) सगळं मार्गी लागत नाही. त्याच्या दोनाचे चार होत नाहीत. तोपर्यंत मला त्या दिशेनं विचार करता येणार नाही, एवढंच नव्हे तर माझ्या डोक्यात सतत त्याचे विचार येत राहतील. म्हणून मी लग्न करत नाही कारण तेव्हा मी ही आनंदी नसेल आणि ती व्यक्तीही. त्यामुळे मी माझ्याबद्दलचा विचार हे सगळं छान सुरळीत झाल्यावरच करणार आहे, असेही तिने स्पष्ट केले आहे. रुपाली भोसले या अभिनेत्रीचा पहिला घटस्फोट झाला आहे. मिलिंद शिंदे हा तिचा पहिला पती होता. या नात्यात तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता. यानंतर रुपाली भोसले अंकित मगरेला डेट करत होती. इव्हेंट मॅनेजर असलेल्या अंकितला रुपाली २०२० पासून ३ वर्ष डेट करत होती. पण नंतर ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. पण आता ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.
https://www.instagram.com/reel/DNsdIaQWJ5V/?igsh=ZzhvOWpscndtMXA=
‘आई कुठे काय करते’ मधून रुपाली भोसले घराघरात पोहोचली. आता ती लवकरच स्टार प्रवाहच्या ‘लपंडाव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात ती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. ‘बडी दूर से आए हैं’ या मालिकेमुळे देखील तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.