ही अभिनेत्री लग्नाआधीच आहे दोन मुलांची आई

आपल्या पेक्षा ११ वर्षाने मोठ्या असणा-या चाॅकलेट हिरोला करतेय डेट, आईनेच दिली हिंट

चेन्नई – अल्लू अर्जुनचा बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एका आयटम साँगमधून अभिनेत्री श्रीलीला चांगलीच हिट झाली होती. श्रीलाला बद्दल वेगळी माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या जोरदार चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनच्या लव्ह लाइफ बाबत जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते देखील उत्सुक आहेत. कार्तिक आर्यन साऊथ अभिनेत्री श्रीलीलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कार्तिकच्या फॅमिली फंक्शनमध्येही ती दिसून आली होती. तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आले आहे. श्रीलीला कार्तिक आर्यनपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. याशिवाय ती दोन मुलांची आई देखील आहे. २०२२ मध्ये श्रीलीलाने दोन दिव्यांग मुलं गुरू आणि शोभिता यांना दत्तक घेत त्यांचं पालकत्व स्वीकारले आहे. श्रीलालाचा जन्म १४ जून २००१ रोजी झाला आहे. तिने आतापर्यंत तेलुगु, कन्नड भाषेतील मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे. सिनेसृष्टीत काम करण्यास श्रीलालाला सुरुवातीला तिच्या घरच्यांनी विरोध केला होता, पण नंतर त्यांचा विरोध मावळला. लवकरच कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांचा एक चित्रपट येणार आहे. त्याचा एक टिझर व्हिडीओ जारी करण्यात आला होता. ‘आशिकी 3’ मधून कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अनुराग बसूच्या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी अर्थात २०२५ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. श्रीलीलाची एकूण नेटवर्थ ही जवळपास १५ कोटी असल्याचं म्हटलं जातं. सुरुवातीला चित्रपटासाठी प्रत्येकी एक तासासाप्रमाणे ४ लाख मानधन ती घ्यायची. त्यानंतर जसजसं तिचे इंडस्ट्रीट नाव होऊ लागले तसं तसं तिचं मानधन वाढले, सध्या चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

श्रीलीलाने तेलुगु आणि कन्नड सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रीलीलाने एमबीबीएस शिक्षण घेतलं आहे. एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण करण्याआधी तिने ‘किस’ चित्रपटातून पदार्पण केले. ती बंगळुरूच्या स्त्रीरोगतज्ज्ञ स्वर्णलताची मुलगी आहे.