
सोशल मिडीयावर पोस्ट करत सांगितला भयंकर अनुभव, आगीमुळे अनेक गावे, वस्त्या जळून खाक

न्युयाॅर्क – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस अँजिलिसमध्ये सध्या आगीमुळे हाहाकार उडाला आहे. या आगीमुळे अनेक गावे, वस्त्या जळून खाक झाल्या. तर २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचा फटका सर्वसामन्यांसह सेलिब्रिटींनाही बसला आहे.


लॉस एंजेलिस काउंटीमधील जंगलातील आगीमुळे आतापर्यंत बरेच नुकसान झाले आहे. या आगीमध्ये अनेक सेलिब्रिटींचेही घरं जळून खाक झाली आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने एक्सवर (ट्वीटर) पोस्ट शेअर करत लॉस एंजेलिसमध्ये जंगलाला लागलेल्या विनाशकारी आगीच्या पार्श्वभूमीवर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय, मी कधीच विचार केला नव्हता की हा दिवस बघण्याची वेळ माझ्यावर येईल. आगीमुळे आमच्या आजुबाजूचा परिसर पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे माझ्या काही मित्र-मंडळींना त्यांचं राहतं घर सोडावं लागलं तर काहींच्या कुटुंबीयांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धूर तसेच सर्वत्र पसरणारे आगीचे लोट आणि आकाशातून बर्फाप्रमाणे राख पडते आहे. त्यामुळे हवा जर थांबली नाही तर पुढे काय होईल? याची भीती आहे. कारण आमच्यासोबत दोन लहान मुले आणि त्यांचे आजी-आजोबा देखील आहेत. पुढे प्रीती म्हणाली कि, माझ्या आजूबाजूला झालेलं नुकसान पाहून मी खूपच दु:खी आहे. पण, आम्ही सुरक्षित आहोत त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. ज्या लोकांना आगीमुळे आपलं घर सोडावं लागलं किंवा या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलंय, त्यांचं दु:खं मी समजू शकते. लवकरात लवकरच हे सगळं थांबावं आणि आगीवर नियंत्रण मिळवता यावं, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. दरम्यान लॉस अँजिलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे घर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी लागलेली आगीमुळे मोठं नुकसान झालं आहे.
https://x.com/realpreityzinta/status/1878156102044700905?t=s_iJ53-jo11EALW2N4BCPQ&s=19
मुळची भारतीय असलेली प्रीती झिंटा लग्न झाल्यापासून अमेरिकेत राहत आहे. तिने लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक असलेल्या आर्थिक विश्लेषक जीन गुडएनफबरोबर लग्नगाठ बांधली आहे. प्रीती झिंटा लग्नापासून लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. जरी ती वारंवार भारतात येत असली तरी, २०१६ मध्ये तिच्या लग्नानंतर ती पूर्णपणे तिथेच स्थलांतरित झाली आहे.










