
अभिनेत्रीच्या त्या पोस्टमुळे अफेअरच्या चर्चांवर शिक्कामोर्तब?, अभिनेत्री लवकरच लग्न करणार? कोण आहे तो?

मुंबई – देशात सध्या गणेशोत्सवाची लगबग आहे. त्यामुळे राज्यात आनंदाचे वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटी देखील गणेश उत्सवात सहभागी झाले आहेत. त्यातच एका अभिनेत्रीने माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत गणेश उत्सव साजरा केला आहे.


अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या रिलेशनशिपची अफवा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे. आता त्यांनी सोशल मीडियावरही त्यांचे नाते जाहीर केल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. अलीकडेच तारा सुतारियाने इन्स्टाग्रामवर गणेशोत्सव स्पेशल फोटो शेअर केले आहेत. ‘भक्ती, श्रद्धा आणि उत्सव… गणपती बाप्पा मोरया’, असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. या पोस्ट मधील एका फोटोत तारा वीर पहाडियासोबत रोमँटिक पोज देताना दिसली. तारा व वीर काही दिवसांपूर्वी डिनर डेटवर गेले होते. त्यानंतर आता त्यांचा नवा व्हिडीओ चर्चेत आहे. ताराने ह्युंदाई इंडिया कॉउचर वीकमध्ये रॅम्पवॉक केला. यावेळी वीर प्रेक्षकांमध्ये बसला होता. त्यानंतर ताराने सर्वांकडे पाहून हात उंचावले आणि वीरला फ्लाईंग किस दिली. त्यावर वीरनेही प्रतिक्रिया दिली. दोघांचा हा क्यूट व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीरच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने यावर्षी ‘स्काय फोर्स’ चित्रपटातून पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे वीर हा जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे.
https://www.instagram.com/p/DN-X6I0CZ_q/?img_index=6&igsh=dnJzM2llb3dqMDFq
तारा सुतारियाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘ओये जस्सी’ आणि ‘द सूट लाईफ ऑफ करण अँड कबीर’ सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिका केल्या होत्या. तसेच ‘अपूर्वा’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘हिरोपंती २’, ‘मर जावां’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये ताराने काम केलं आहे.










