
मुलाखतीत केले धक्कादायक खुलासे, पतीवर आरोप, दोन लग्न करूनही एकटी जगतेय आयुष्य

मुंबई – बाॅलीवूड किंवा टिव्ही अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता आणखी एक अभिनेत्री आपल्या आधीच्या आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने चक्क आपल्या पतीला पोटगी दिली होती.


अभिनेत्री श्वेता तिवारीने एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. १९९८ मध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीने राजा चौधरीशी लग्न केले. मात्र २०१२ मध्ये, अभिनेत्रीने राजावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोट घेतला. श्वेता म्हणाली की राजा तिला खूप मारहाण करायचा. त्यांना पलक तिवारी नावाची मुलगी होती. पण राजाने तिचा संभाळ करण्यास नकार दिला होता. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं. तिला या लग्नातून मुलगा रेयांश झाला. पण हे लग्नही टिकू शकलं नाही आणि २०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. श्वेताने मुलाखतीत श्वेताने तिचा माजी पती राजा चौधरीबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत. ती म्हणाली, घटस्फोटाच्या तडजोडीत तिने राजा चौधरीला ९३ लाख रुपयांचा फ्लॅट दिला होता. मालमत्तेच्या वादामुळे तिच्या माजी पतीने तिच्या मुलीला सोडलं तेव्हा तिला धक्का बसला होता. श्वेता म्हणाली, ‘राजाने जेव्हा सांगितलं की मी मालमत्तेसाठी माझ्या मुलीचा त्याग करण्यास तयार आहे तेव्हा मला धक्का बसला. तू मला फ्लॅट दे आणि मी तुला घटस्फोट देईन.’ असे सांगितले होते. राजा चौधरीसोबतच्या तिच्या प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध होता. तिच्या कुटुंबात कधीही प्रेमविवाह झाला नव्हता. पण आपण तरीही लग्न केले, पण आपला विश्वासघात झाला याची खंत तिने व्यक्त केली.
https://www.instagram.com/reel/DIIg9W2N9pC/?igsh=cnplOWh1dmprdjJq
श्वेताचं नाव सध्या ‘नागिन ७’ या आगामी मालिकेशी जोडलं जात आहे. तिचा नागिन लूक सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. चाहत्यांनीही त्या लूकचं भरभरून स्वागत केलं आहे. त्यामुळे श्वेता तिवारी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.










