
रिझर्व बँकेकडून देशातील सुरक्षित बँकांची यादी जाहीर,इथे तुमचे पैसे राहतील सुरक्षित

दिल्ली – अलिकडच्या काळात बँक घोटाळ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अशा परिस्थितीमध्ये आपली बचत कोणत्या बँकेत जमा करायची याबाबत अनेकदा साशंकता निर्माण होते. पण आता आरबीआयने याबाबत एक यादी जाहीर करत नागरिकांना दिलासा दिला आहे.

बँक बुडाल्याच्या अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. बँक बुडाल्यानंतर ग्राहकांना आपले पैसे परत मिळवण्यासाठी खुप संघर्ष करावा लागतो. त्यानंतरही पैसे मिळतील याची खात्री नसते. अनेकदा जास्त व्याजदाराच्या आशेने ग्राहक चुकीच्या पतसंस्था किंवा बँकेत देखील गुंतवणूक करत असतात, पण अशा ठिकाणी धोका देखील जास्त असतो. आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी खाजगी तसेच सरकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स सुद्धा आरबीआयकडून रद्द करण्यात आले आहे. पण आता ग्राहकांच्या सोसायटीसाठी आरबीआयने सुरक्षित बँकाची यादी जाहीर केली आहे. या ठिकाणी आपले पैसे सुरक्षित राहतील, याची हमी आरबीआयने दिली आहे.
देशातील सुरक्षित बँक यादी
१) स्टेट बँक ऑफ इंडिया
२) एचडीएफसी बँक
३) आयसीआयसीआय बँक
४) कोटक महिंद्रा बँक
५) एक्सिस बँक
६) इडून्सलॅन्ड बँक
७) बँक ऑफ बडोदा
८) पंजाब नॅशनल बँक
९) यूनियन बँक
१०) कॅनरा बँक









