पूर्ववैमनस्यावरुन तरुणावर केला होता वार ; फरार आरोपीना पोलिसांनी केले २ तासात जेरबंद

पुणे – पूर्ववैमनस्यावरुन तरुणावर वार करुन पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने वारजे येथे पकडले. हर्षद संदीप वांजळे (वय १८) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

तरुणावर वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज हवेली पोलिसांनी सर्वत्र पाठविले होते. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना बातमी मिळाली की, खुनाचा प्रयत्न करुन पळून गेलेले आरोपी वारजेमधील असून नर्‍हे येथील बंद पडलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नर्‍हेमधून दोघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईकरीता त्यांना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे.