तरुणाने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलवले आणि …

 एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी एका तरुणावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

हा प्रकार २० मार्च २०२४ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत आरोपीच्या घरी वारंवार घडला आहे. याबाबत १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी दि.२ जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सद्दाम छिद्दु खान , वय-२२ याच्या विरोधात आयपीसी ३५४, ३५४(अ), ३७६, ३७६(३), ५०६ पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून, ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडितेच्या घरात कोणी नसताना तिला इशारा करुन घरी बोलावून घेतले. मुलगी घरी आल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने वारंवार तिला घरी बोलवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.