
या महिन्यात सुरु होणार शूटिंग, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, चित्रपटामुळे ही आॅफर नाकारली?

प्रयागराज – प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातून माळा विकणारी मोनालिसा भोसले चांगलीच व्हायरल झाली होती. पण माळा विकून उपजीविका करणाऱ्या मोनालिसाचे दिवस आता बदलणार असून लवकरच ती एका चित्रपटात झळकणार आहे. महाकुंभ मेळ्यात साधू-संत आणि भाविकांच्या गर्दीत गळ्यातील माळा विकणारी मोनालिसा चर्चेत आली होती.


महाकुंभमेळ्यात फुलांच्या माळा विकणारी मोनालिसा तिच्या सुंदर डोळ्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिचे फोटो-व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते. पण याचा तिला आता फायदा होताना दिसत आहे. बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्राने त्याला त्याचा आगामी चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’ ऑफर केला आहे, ज्याची माहिती त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दिली आहे. सनोज मिश्रा हे सिनेविश्वातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द डायरी ऑफ बेंगाल’ या चित्रपटाद्वारे सनोजचे नाव प्रसिद्धीझोतात आले होते आणि या चित्रपटाद्वारे त्याला खूप प्रसिद्धीही मिळाली होती. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये ती एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल ते जून या कालावधीत ईशान्य भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी होईल. हा चित्रपट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होईल. शूटिंगपूर्वी मोनालिसाला मुंबईत तीन महिने अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाईल. महाकुंभात चाहत्यांकडून सतत होणाऱ्या छळामुळे मोनालिसा आणि तिचे वडील मध्य प्रदेशातील महेश्वर येथील त्यांच्या घरी गेले आहेत. चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाकुंभात व्हायरल झाल्यानंतर, मोनालिसाला चित्रपट ऑफर करणारा मी पहिला होतो, आम्ही आगामी चित्रपटासाठी तिला साईन केलं आहे. हा चित्रपट खूपच कमी बजेटचा आहे. या चित्रपटाचं बजेट सुमारे २० कोटी रुपये असेल. या चित्रपटात मोनालिसासोबत प्रसिद्ध चित्रपट अभिनेता राजकुमार राव याचा मोठा भाऊ अमित राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, दिग्दर्शक आणि अभिनेता महेंद्र लोधी सारख्या मोठ्या कलाकारांसह मणिपूरमधील बहुतेक स्थानिक कलाकार असणार आहेत.

मोनालिसाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिने यातून किती कमाई केली असेल याबद्दल लोकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. इंदोरला परतल्यानंतर, मोनालिसाने एक्सवर याबद्दल माहिती दिली आहे. तिने सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी तिने आभार मानले आहेत.









