पाऊस निरोप घेणार! ‘या’ तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

मान्सून जाता जाता झोडपणार, या तारखेपासून महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय?

मुंबई – महाराष्ट्रात लवकरच परतीचा पाऊस सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून हा पावसाचा प्रवास सुरु होणार असून राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. हा कमी दाबाचा पट्टा पुढील दोन दिवसात ओडिशा आणि छत्तीसगढच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेले साडेतीन महिने मान्सून देशभर भरभरून बरसला आहे.सर्व धरणे तुडुंब भरली त्यामुळे समाधानकारक स्थिती आहे.गत दहा वर्षापूर्वी सप्टेंबरच्या दुसऱ्या टप्प्यात मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरू होत असे मात्र गेल्या काही वर्षात परतीचा प्रवास लांबला होता. भारतीय हवामान विभाग च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

 

शेतकरी सध्या खरीप हंगामातील पिकांच्या शेवटच्या टप्प्यातील कामकाजात गुंतलेले आहेत. कारण मागे झालेल्या पावसामुळे काही भागात शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कित्येक हेक्टर पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आता सर्वजण या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या प्रभावाची आतुरतेने वाट पाहत आहेत.