हवामान विभागाकडून राज्याला सतर्कतेचा इशारा, या तारखेला राज्यात मुसळधार, या जिल्ह्यात यलो अलर्ट
मुंबई – आठवडाभरापुर्वी दमदार बॅटिंग केल्यानंतर शांत झालेला पाऊस आता पुन्हा एकदा त्याने महाराष्ट्रात जोरदार कमबॅकची तयारी केली आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ज्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे, त्यामुळे ऎन गणेश उत्सवात पाऊस महाराष्ट्राला झोडपणार आहे. येत्या २६ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये २६ ते २८ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेल्यावेळी बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा निर्माण झाला होत्या, त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, पावसानं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाब च्या परिसरात सक्रिय असणार आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यातील पावसाने जीवित, शेती आणि स्थावर, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.