
पोलिसांच्या कारवाईत सराईत गुन्हेगार गजाआड, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, पोलिसांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले

पुणे – पुणे गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांनी पुन्हा एकदा आपल्या चोख तपास व तत्पर कारवाईद्वारे मोठा यश मिळवले आहे. घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस ताब्यात घेत पथकाने तब्बल ५ गुन्हे उघडकीस आणले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी आरोपीकडून तब्बल २१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोठ्या कामगिरीबद्दल पोलिसांचे अभिनंदन होत आहे. युनिट ६ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग दरम्यान चोखीढाणी, खराडी रोड, वाघोली परिसरात असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचून बिरजू राजपूतसिंग दुधानी यास नंबर प्लेट नसलेल्या स्विफ्ट डिझायर कारसह ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून ₹२१,४०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी मोक्का गुन्ह्यातील आरोपी असून सध्या जामिनावर सुटलेला आहे. त्याच्यावर मुंढवा, येरवडा, चिखली, भोसरी एमआयडीसी आणि संत तुकारामनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. कमाल म्हणजे तपासादरम्यान आरोपीकडे विविध घरफोडी प्रकरणांतील सोन्याचे दागिने आणि चोरीची गाडी आढळून आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना चकवणाऱ्या आरोपीला अटक केली होती. आता पुन्हा एकदा पोलिसांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल नागरिक कौतुक करत आहेत, पण गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
या यशस्वी ऑपरेशनमध्ये सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, तसेच पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी मोलाची भूमिका बजावली.









