
एका अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर ओळख करुन तिच्याकडे अश्लील फोटो व्हिडीओची मागणी केली. तसेच मुलीचे फोटो मॉर्फ करुन तिला पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ७ जुन २०२४ या कलावधीत स्नॅपचॅट तसेच इंन्स्टाग्रामवर घडला आहे

याबाबत एका अल्पवयीन मुलीने सोमवारी दि.२४ रोजी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन एका इमेल आयडी धारकावर आयपीसी ३५४ड,५०७, आयटी अॅक्ट, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची स्नॅपचॅट व इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांना चॅटींग करुन लागले. त्याचे फोटो एकमेकांना पाठवले.

त्यानंतर आरोपीने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केले. त्यामुळे तिने आरोपीला ब्लॉक केले. त्यामुळे आरोपीने वेगवेगळ्या नंबरवरुन फोन करुन तिला त्रास दिला. पिडीत मुलीचा व तिच्या घरच्यांचे मेल आयडी व पासवर्ड घेतले. पिडीत मुलीला तिचे न्युड फोटो व व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. फोटो व व्हिडीओ पाठवले नाही तर तुझे फोटो न्युड करुन आई-वडिलांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच पिडीत मुलीचे नॉर्मल फोटो न्युड करुन ते पिडीत मुलीला पाठवून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.









