
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती, महिलांना २१०० हप्त्यावर म्हणाल्या जाहीरनामा….

मुंबई – राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत महिला दिनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार मिळतील अशी घोषणा केली होती. पण काल महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यातील हप्ता जमा झाला. त्यामुळे मार्चच्या हप्त्याविषयी चर्चा सुरू झाली होती. पण आता त्याचे उत्तर समोर आले आहे.

राज्यातील जवळपास दोन कोटी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेत फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांतील तीन हजार रुपये एकत्रित देण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार हप्त्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत २ कोटी ५२ लाख महिलांच्या खात्यात शुक्रवारी सायंकाळपासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आता मार्च महिन्याचे पैसे केव्हा मिळणार याची माहिती मंत्री तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरीत करण्याची प्रक्रिया ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १२ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. सध्या महिलांना १५०० रुपये हफ्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४६००० हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदत १५०० रूपयांवरून २१०० रूपये करू, असे अश्वासन दिले होते.
राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, जाहीरनामा हा ५ वर्षांचा असतो. अद्याप मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी २१००रुपये देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाडकी बहिण योजनेतील महिलांना एप्रिलमध्ये किती रुपये मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









