महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी सात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दौंड विधासभा मतदार संघातून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. या चौथ्या यादीत माण, काटोल, खानापूर, वाई, दौंड, पुसद, सिंदखेडा, या मतदारसंघांचा समावेश आहे.
चौथ्या यादीमधील उमेदवार
- माण – प्रभाकर घार्गे
- काटोल- सलील अनिल देशमुख
- खानापूर- वैभव सदाशिव पाटील
- वाई- अरुणादेवी पिसाळ
- दौड- रमेश थोरात
- पुसद- शरद मेंद
- सिंदखेडा- संदीप बेडसे