
अभिनेत्रीचा लुक पाहून चाहते थक्क, विश्वासही बसेना, मिका सिंगने केले होते गंभीर आरोप

मुंबई – आपल्या फिटनेसमुळे ‘ब्लॅक ब्युटी’ बिपाशा बासू नेहमीच स्वतकडे अनेकांना आकर्षित करत असते.
पण सध्या ती वेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आता तिला ओळखणेही कठीण झाले आहे. जिमबाहेर येतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तिचं वजन कमालीचे वाढलेलं दिसत आहे.


बिपाशा आणि पती करणसिंह ग्रोवर अनेकदा लेकीसोबतचे गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या मालदीव ट्रीपचेही फोटो चर्चेत होते. मात्र आता नुकताच बिपाशाचा समोर आलेला लूक पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिममधून बाहेरस निघतानाचा तिचा हा व्हिडिओ आहे. ट्रॅप पँट, टॉप आणि गळ्यात जिम बॅग, हातात बॉटल अशा लूकमध्ये ती दिसत आहे. बिपाशाचा चेहरा एकदम जाड दिसत असून ती एकूणच स्थूल झालेली दिसत आहे. बिपाशाचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर हे जोडपे. जवळजवळ पाच वर्षे ते कोणत्याही प्रोजेक्टमध्ये अभिनय करताना दिसले नाहीत. याच दरम्यान गायक मिका सिंगने बिपाशावर कराराप्रमाणे न वागल्याचा आरोप केला होता. तसेच यामुळेच त्यांना आता काम भेटत नसल्याचे म्हटले आहे.
https://www.instagram.com/reel/DJ57Kh1ImS4/?igsh=dHQzZGFoMXFlOWtv
लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून बिपाशा बसुची ओळख आहे. धूम 3, रेस 2, जिस्म, फिर हेरा फेरी सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये तिने आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. एप्रिल 2016 मध्ये बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनं लग्न केलं होते. तेंव्हापासून ती चित्रपटापासून लांब आहे.










