प्रसिद्ध अभिनेत्रीला यामुळे मुंबईत मिळत नाहीये घर

Oplus_131072

घर मालकाकडून विचारले जात आहेत अजब प्रश्न, पण या प्रश्नामुळे अभिनेत्री संतापली

मुंबई – रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेली अभिनेत्री यामिनी मल्होत्रा सध्या खूप अडचणींचा सामना करत आहे. ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून मुंबईत राहण्यासाठी घर शोधत आहे पण लोक तिला घर देण्यास तयार नाहीत. पण त्यासोबत विचारण्यात येणा-या प्रश्नामुळे अभिनेत्री संतापली आहे.

यामिनी मल्होत्राला मुंबईत घर शोधताना खडतर प्रवास करावा लागला. याबाबत तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला अनुभव शेअर केला आहे. तिची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. यामिनी मल्होत्रा म्हणाली की, नमस्कार, मला तुम्हाला निराशाजनक घटना सांगायची आहे. जितकी मला मुंबई आवडते. तितकंच इथे घर शोधणं खूप कठीण आहे. मला अनेक प्रश्न विचारले गेले की, तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम?, गुजराती की मारवाडी? आणि मी एक अभिनेत्री आहे असं म्हणताच समोरून स्पष्टपणे नकार दिला जात होता. मी अभिनेत्री असल्यामुळे मी घरासाठी पात्र ठरतं नाही का? २०२५मध्ये अजूनही असे प्रश्न विचारले जात आहेत, हे धक्कादायक आहे. जर स्वप्न इथे अटींनुसार पूर्ण होतं असतील तर आपण याला खरंच स्वप्नांचं शहर म्हणू शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याआधीही काही अभिनेत्रींना मुंबईत घर मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री चारू असोपाला देखील घटस्फोटानंतर घर मिळत नव्हते.

यामिनी मल्होत्रा ​​’बिग बॉस १८’ पूर्वी अनेक टीव्ही शोचा भाग राहिली आहे. तिने स्टार प्लसवरील ‘गुम है किसी के प्यार में’ आणि ‘मैं तेरी तू मेरा’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.