‘एचएसआरपी’ नंबर प्लेट साठीची मुदत उद्या संपणार

नंबरप्लेट बसवा अन्यथा भरावा लागणार एवढ्या हजाराचा दंड, एवढी वाहने एचएसआरपी विना

दिल्ली – राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट प्लेट्स बसवण्यासाठीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ रोजी संपत आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ७०% जुन्या वाहनांवर अजूनही या प्लेट्स बसवलेल्या नाहीत.

केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी HSRP प्लेट्स अनिवार्य केल्या आहेत. १ जानेवारी २०२५ पासून ही मोहीम सुरू झाली असून, परिवहन विभागाने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिला आहे. गेल्या सात महिन्यांत केवळ २०% टक्के वाहनांवरच HSRP प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. उद्यापासून ज्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट नसेल त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. वाहन चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने या प्लेट्स अनिवार्य केल्या आहेत. त्यावर विशिष्ट लेझर-कोरलेला कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक यंत्रणा असते, ज्यामुळे त्यांची बनावट किंवा छेडछाड करणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे अधिक सोपे होते.

गेल्या काही महिन्यांपासून परिवहन विभागाने HSRP बसवण्यासाठी अनेकदा अंतिम तारीख पुढे ढकलली आहे. सुरुवातीची मुदत मार्च 2025 होती, त्यानंतर ती अनेक वेळा वाढवून अखेर १५ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, यानंतर आणखी मुदतवाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे.