
कोट्यवधीची आहे मालकीण, आयपीएलशी आहे खास नाते, नात्याची चर्चा पण…

हैदराबाद – आयपीएल २०२५च्या हंगामाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत दहाच्या आसपास सामने झाले आहेत. पण आयपीएल चालू झाल्यापासून सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारनची चर्चा होत आहे.


काव्या मारन संघाच्या प्रत्येक मँचला उपस्थित असते. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. पण आता काव्या एका संगीतकाराला डेट करत असल्याचे समोर आले आहे. काव्या मारनचे नाव संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा होती की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अनिरुद्ध रविचंदर हा लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आणि गायक आहे. तो दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्याने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये संगीत दिले आहे. काव्या व अनिरुद्धची ‘चांगली मैत्रीण’ आहे आणि तो नियमितपणे सन ग्रुप निर्मित चित्रपटांसाठी काम करतो. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्ध रविचंदरच्या टीमने काव्या मारनसोबतचे त्यांचे नाते नाकारले आहे. विशेष म्हणजे याआधी अनिरुद्धचे नाव अभिनेत्री कीर्ती सुरेशशीही जोडले गेले आहे. गेल्या वर्षी २०२४ मध्ये, सोशल मीडियावर चर्चा होती की कीर्ती अनिरुद्धशी लग्न करत आहे. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे निष्पन्न झाले आणि कीर्तीने तिचा प्रियकर अँटनी थाथिलशी लग्न केले. अनिरुद्ध हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात संगीत देण्यासाठी त्याने १० कोटी रुपये घेतले होते. फीच्या बाबतीत त्याने ए.आर. रहमान आणि प्रीतमला मागे टाकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार रहमान ७-८ कोटी रुपये फी घेतो. दरम्यान काव्याने इंग्लंडमध्ये वारविक बिझनेस स्कूलमधून MBA (मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन) चं शिक्षण घेतलंय. हे बिझनेस स्कूल जगभरातील प्रसिद्ध संस्थेपैकी एक आहे. या कॉलेजमध्ये काव्याने व्यवसाय व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्ये आत्मसात केली आहेत.

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ही नॅशनल क्रश आहे. काव्या मारनची एकूण संपत्ती ४०९ कोटी रुपये आहे. ती सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. तिच्या अनेक महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. तिला फॅशन आणि ट्रॅव्हलचीही आवड आहे आणि ती अनेकदा स्टायलिश लूकमध्ये दिसते.










