
सोशल मिडीयावर अभिनेत्री ट्रोल, सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हणाली, माझ्या मूर्खपणा…

मुंबई – बाॅलिवूड स्टार सैफ अली खानवर त्याच्याच घरात हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने सैफवर त्याच्या घरात सहा वेळा चाकूने हल्ला केला ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. पण सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला माफी मागावी लागली आहे.

सैफवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि आता तो धोक्याबाहेर आहे. सैफवरील हल्ल्याची माहिती समोर येताच इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली. सर्व सेलिब्रिटींनी अभिनेत्याच्या तब्येतीची विचारपूस सुरू केली. परंतु उर्वशी रौतेलाने सैफ अली खानची माफी मागितली आहे. त्याचे झाले असे की सैफच्या हल्ल्याविषतयी उर्वशीला प्रश्न विचारण्यात आला. तेंव्हा ती म्हणाली की, सैफसोबत जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. आता डाकू महाराजने १०५ कोटींचा टप्पा बॉक्स ऑफीसवर पूर्ण केलाय आणि माझ्या आईने मला हिरेजडीत रोलेक्स घड्याळ गिफ्ट केलं. तर माझ्या वडिलांनी मला हे मिनी वॉच गिफ्ट म्हणून दिलं. त्यानंतर उर्वशीने ते घड्याळ दाखवत फ्लाँट केलं. त्यानंतर ती म्हणाली, की पण हे सगळं घालून आपण बाहेर पडू शकत नाही ना. असुरक्षित वाटू लागलं आहे, की कोणीही येऊन हल्ला करू शकतं. असं विचित्र उत्तर उर्वशीने दिले. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उर्वशीने घड्याळ फ्लाँट केल्याने ती नेटिझन्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्वशीला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. दरम्यान सैफवरील हल्ल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सैफच्या तब्येतीबाबत आणि या घटनेबाबत वक्तव्य करत आहेत. तसेच बॉलिवूड कलाकारांनी सैफची व करीनाची भेट घेत विचारपूसही केलेली पाहायला मिळाली आहे.

माझ्या मूर्खपणा आणि आक्रमकतेबद्दल कृपया मला माफ करा. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच मला खूप वाईट वाटले. मला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे आणि अशा कठीण काळात तुमच्या सभ्यतेची आणि प्रतिष्ठेची प्रशंसा करायची आहे; तुमच्या ताकदीबद्दल मला तुमचा खूप आदर आहे.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.









