पुणे शहरातील महावीर चौकात कर्तव्यावर असताना चिरीमीरी घेणाऱ्या वाहतूक पोलीसचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दखल घेऊन चिरीमीरी घेणाऱ्या लष्कर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार विजय मेवालाल कनोजिया यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी ही कारवाई केली आहे.
Home पुणे पुणे जिल्हा भररस्त्यात ‘वसुली’ करणाऱ्या वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई व्हिडीओ व्हायरल,बघा व्हिडीओ