कष्टकरी व बारा बलुतेदार ,धनगर समाजाचा अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंबा

हडपसर मतदारसंघाची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रत्येक उमेदवार हे आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी ,समस्या जाणून घेताना दिसत आहेत. अशातच अपक्ष उभे असलेले गंगाधर बधे यांना वाढत्या मतदारांच्या प्रतिसादामुळे विजयाचा आलेख वाढला आहे. उमेदवारांमध्ये अव्वल नंबर वर असलेले गंगाधर बधे यांना लोकवस्त्या, रहिवासी सोसायटी मधील मतदारांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.हडपसर विधानसभा मतदारसंघातील एकमेव अपेक्षा उमेदवार गंगाधर बधे यांची रॅली पदयात्रा पाहून मतदार संघामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी कोंढवा बुद्रुक येथून पदयात्रा व बाईक रॅलीला सुरुवात झाली ही बाईक रॅली पुढे श्रीराम चौक टिळेकर नगर, सर्व गल्ल्या, केदारेश्वर नगर, पाण्याची टाकी, राजमाता कॉलनी, आर के कॉलनी, यानंतर गोकुळ नगर व त्या ठिकाणी सर्व गल्ल्या या भागांमध्ये संपन्न झाली. दरम्यान पदयात्रा व बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गंगाधर बधे यांना रस्त्यामध्ये थांबून विजयाचा आशीर्वाद दिला.आपल्या सामाजिक कार्यातून सर्व धर्माच्या बांधवांना आपलेसे करून ठेवने, मतदार संघातील ज्येष्ठ नागरिक असो, गरीब कष्टकरी फेरीवाले पथारीवाले यांना मदत करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून गंगाधर बधेंची चर्चा रंगली आहे.

याच त्यांच्या सामाजिक कार्यामुळे मतदारसंघातील विविध समाजातील व काही बारा बुलतेदारांनी पाठिंबा दर्शवला. मतदारसंघातील  काही धनगर समाजाच्या अनेकांनी धनगर समाजातील मानाची असलेली घोंगडी आणि काठी भंडारा उधळून गंगाधर बधे यांना आशीर्वाद दिले आहेत. सिताराम कोळेकर यांनी सांगितले, गंगाधर बधे यांनी नेहमीच नागरिकांचे हित जपण्याचा काम केले, चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख आहे. इतर राजकीय नेते केवळ वापर करून घेण्याचा प्रयत्न करतात, मतदारांची किंमत ही निवडणुकी पुरतीच असते, त्यामुळे विकास कामे करणारे व कष्टकरी वर्गाचे हित जपणारे गंगाधर बधे यांनाच निवडून द्यावे असे आवाहन सामान्य नागरिकांनी केले आहे.