
अतिवृष्टी होऊनही एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत, सरकारकडून वाढीव मदत नाही, शेतकऱ्यात नाराजीचा सूर

मुंबई – राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आज अखेर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शासन आदेश जारी केला. या शासन आदेशात पीक, पशुधन, जमिन आणि घरांसह सर्वच नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू/साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून सरकारने घोषित केले आहेत. पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिन खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपये मदत व पुनर्वसन विभागाकडून दिले जाणार आहेत. तसेच रोजगार हमी योजना विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त ३ लाख प्रति हेक्टर या मर्यादेत व २ हेक्टर पर्यंत ५ लाख रुपये दिले जाणार आहेत.
पीक नुकसानीची मदत ३ हेक्टरपर्यंत
कोरडवाहू पीके…८५०० रुपये
बागायती पीके…१७ हजार रुपये
फळपीके…२२,५०० रुपये
पशुधन नुकसानीसाठी मदत
पशुधन…मदत (प्रत्येकी)
गाय, म्हैस…३७,५०० रुपये
शेळी मेंढी…४ हजार रुपये
बैल, घोडा…३२ हजार रुपये
वासरू, गाढव, शिंगरू…२० हजार रुपये
कोंबडी…१०० रुपये, १० हजार मर्यादा
जिवित हानी अथवा अंगत्व आल्यास मदत
नुकसान…मदत
मनुष्य जिवित हानी…४ लाख
४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास…७४ हजार
६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास…२.५ लाख
जखमी व्यक्ती…५४०० रुपये, एक आठवड्यापेक्षा अधिक दवाखान्यात राहील्यास १६ हजार
घरांचे नुकसान झाल्यास मदत
नुकसान…मदत
पक्की किंवा कच्ची घरे नष्ट झाल्यास…सपाट भागात १.२० लाख आणि डोंगराळ भागात १.३० लाख
पक्की घरे अंशतः पडझड…६५०० रुपये
कच्ची खरे अंशतः पडझड…४ हजार रुपये
झोपड्या नष्ट किंवा पडझड…८ हजार रुपये
घराला जोडून गोठा….३ हजार रुपये
शेत जमिनीचे नुकसानीची मदत
शेत जमिनिवरील गाळ साचल्यास…१८ हजार रुपये, कमीत कमी २२०० रुपये
जमिन खरडणे, पुरामुळे जमिन वाहणे…४७ हजार, कमीत कमी ५ हजार
मासेमारांसाठी मदत
बोटीचे अंशतः नुकसान…६ हजार रुपये
बोटीचे पूर्ण नुकसान…१५ हजार रुपये
जाळ्यांचे अंशतः नुकसान…३ हजार रुपये
जाळ्यांचे पूर्ण नुकसान…४ हजार रुपये
मत्स्यबीज…अल्पभुधारक हेक्टरी १० हजार









