(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन जुगारात घेतलेलं कर्ज फेडता न आल्याने पती-पत्नीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलाने घेतलेलं कोट्यवधी रुपयांचं कर्ज फेडता न आल्याने या जोडप्याने कीटकनाशक प्यायलं आहे”, महेश्वर रेड्डी यांनी दोन कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांची पाच एकर जमीन यापूर्वीच विकली होती. उर्वरित कर्जाची परतफेड करण्यासाठी स्थानिक न्यायालयात झालेल्या निर्णयानुसार त्यांनी कुटुंबाचं घर आणि इतर मालमत्ताही जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गेल्या सहा महिन्यांपासून पती-पत्नी नातेवाईकांकडे राहत होते, तर मुलगा हैदराबाद येथे राहत होता. मंगळवारी रात्री ली.यू.महेश्वर रेड्डी आणि त्यांच्या पत्नीने नांद्याला जिल्ह्यातील अब्दुल्लापुरम गावात त्यांच्या शेतात आत्महत्या केली आहे. सावकारांच्या वाढत्या दबावामुळे या जोडप्याला हे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याचं त्यांनी सांगितले.