मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा धक्कादायक निकाल जाहीर

सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, पीडीत मागणार हायकोर्टात दाद, १७ वर्षानंतर निवाडा

मालेगाव – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुरावे नसल्याने कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच संशयावर कारवाई करत येणार नाही.

न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाचा निकला देताना न्यायालयाने काही मुद्दे उपस्थित केले. कोर्टाने म्हटले, पंचनामा करण्यात त्रुटी आढळून आल्या. सुरवातीला एटीएस आणि नंतर एनआयएने तपास केला. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध ठोस पुरावे आढळले नाहीत. सुरवातीला मकोका अंतर्गत काही कलमे लावण्यात आलीत, त्यानंतर ती काढून टाकण्यात आलीत. यानंतर युएपीए कायद्यांतर्गत पुढे तपास सुरु राहिला मात्र इथे युएपीए लागू होत नसल्याचे कोर्टाने म्हटले. कोर्टाने म्हटले, संशयाचा फायदा घेत यांना अटक करण्यात आली होती. सबळ पुरावे नसल्याचे सांगत कोर्टाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयाने निकाल दिला. मालेगाव बॉम्बस्फोट झाला हे सरकारी वकिलांनी सिद्ध केले. परंतु मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. जखमींची संख्या १०१ नाही तर ९५ होती आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालयासमोर आला आहे.

दरम्यान २९ सप्टेंबर २००८ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारासबॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. अखेर या खटल्याचा निकाल समोर आला आहे.