धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे . घरातील पत्र्याला गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केली असून घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये तिच्या दोन्हीही लहान मुलांचा मृतदेह सापडले आहे. २४ नोव्हेंबर सायंकाळी ही घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथे हि घटना घडली
आहे.
हि घटना उघडकीस आली तेव्हा दोन छोट्या बाळांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. तसेच या दोन्ही बाळांची आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. श्रेया घट्टे, श्रेयस घट्टे अशी या बाळांची नावे असून अवघ्या काही महिन्यांची होती. राधिका घट्टे (२५) मृत महिलेचे नाव आहे. एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने परिसरात गोंधळाचे वातावरण असून दोन्ही बाळांना मृत अवस्थेत आणि आईस गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू असून अध्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. घरातील पत्र्याच्या अडूला दोरीने गळफास घेत महिलेने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत महिलेच्या दिराने नळदुर्ग पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला व दोन्ही बाळांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. एकाच घरातील तिघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास सुरू आहे