
सराईत गुन्हेगारांना पकडून येरवडा पोलिसांनी त्यांच्याकडून वाहन चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून २ मोपेड गाड्या व ६ मोबाईल असा २ लाख २१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. यश सागर ओंबाळे (वय २३), ओमकार राजेश मोरे (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, दोन संशयित दोन मोपेड विक्री करण्यासाठी येरवडा येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार येत असलेल्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील गाड्यांची चौकशी केली. तेव्हा त्यातील एक चतु:श्रृंगी पोलीस ठाणे तर एक शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल होते. पोलिसांनी दोन्ही मोपेड व ६ मोबाईल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केली आहे.









