धक्कादायक !! पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍या रुग्‍णालयात उपचारासाठी आलेल्‍या मायलेकीचा विनयभंग

पिंपरी चिंचवड – नातेवाईकांना घेऊन रुग्‍णालयात उपचारासाठी आलेल्‍या मायलेकीचा वॉर्डबॉयने विनयभंग केला. ही घटना पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍या थेरगाव येथील रुग्‍णालयात शनिवारी (दि. ७) रात्री आठ वाजताच्‍या सुमारास घडली.

रोहन बाळासाहेब कांबळे (वय २४) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत चिंचवड येथे राहणार्‍या ४२ वर्षीय महिलेने रविवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी

दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांची नातेवाईक महिलेला एमआरआय करण्‍यासाठी थेरगाव येथील महापालिकेच्‍या रुग्‍णालयात शनिवारी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास आणले होते. त्‍यावेळी फिर्यादी महिला व त्‍यांच्‍या मुलीच्‍या अंगाला स्‍पर्श करीत आरोपी रोहन कांबळे याने विनयभंग केला. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.